Latest Marathi News
Ganesh J GIF

वाल्मिक कराड प्रकरणात आता धनंजय मुंडेंच्या पत्नीचेही नाव

कराड प्रकरणात धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला? कागदपत्रामुळे मुंडे अडचणीत?

बीड – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रकरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपा आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून या प्रकरणावर नवनवीन खुलासे करत आहेत. त्यातच आता त्यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीविषयी मोठा खुलासा केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. आका आणि आकाच्या आकाचे परळीत वेगवेगळे उद्योग सुरु असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. तसेच पुण्यात आकाकडे ७ शॉप असून आकाच्या गाडी चालकाच्या नावावर १५ कोटींचा इमारतीचा संपूर्ण एक मजला असल्याचा दावा धस यांनी केला आहे. त्याचबरोबर अंजली दमानिया यांनीही कराड आणि मुंडे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया एक्सवर अंजली दमानिया यांनी या संदर्भात कागदपत्र पोस्ट केली आहेत. वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या संचालक आहेत. त्या कंपनीचा २०२२ चा महसूल १२ कोटी २७ लाख रुपये इतका दाखण्यात आलाय. २०२२ सालच्या बॅलन्स शीटमध्ये राजश्री धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक बाबूराव कराडच नाव रिलेटेड पार्टीज म्हणून दर्शवण्यात आले आहे. दरम्यान बीडमध्ये वाल्मिक कराड याच्या मालकीचे वाईन शॉप असल्याचाही अंजली दमानिया यांनी आरोप केलाय. बीडमधल्या या वाईन शॉप पॅटर्नवरुन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. केज, वडवणी, परळी बीड येथे वाल्मिक कराडच्या मालकीचे चार ते पाच वाईन शॉप असल्याचा दावा करण्यात आला आहे.

वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनजंय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. तर, वाल्मिक कराडच या सगळ्यामागचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!