
‘या’ कारणामुळे झाला होता दिशा सालियनचा मृत्यू
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून महत्वाची माहिती उघड, तपासाची दिशा बदलणार?, काय आहे रिपोर्टमध्ये?, कसा झाला मृत्यू
मुंबई – दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशाच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तिच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाची दिशा बदलणार आहे.
दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून झाल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा ही आत्महत्या असल्याचं म्हटले गेलं. मात्र आता तिच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्याला मोठ्या स्वरूपाची इजा झाल्याचं नमूद करण्यात आले असून, तोंड आणि नाकातून रक्तस्त्रावही झाल्याची नोंद आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.दिशाच्या शरीरावर जखमा झाल्या असून त्या अनैसर्गिक आहेत. पण तिच्यावर कोणताही बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाला नाही. त्यामुळे दिशाच्या वडिलांनी जो आरोप केला होता त्याचा पुरावा मात्र यातून समोर येत नाही. असं असलं तरी दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दिशाचे पोस्टमॉर्टम हे पाच वर्षांपूर्वी करण्यात आलं असून ते राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले आहेत.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत या प्रकरणी नव्याने याचिका दाखल केली आहे. सामुदायिक बलात्कार केल्यानंतर दिशाची हत्या करण्यात आली आहे असा आरोप सतीश सालियन यांनी त्यांच्या याचिकेतून केला आहे.