चिकन आवडीने खाता का? मग ही बातमी वाचाच
महाराष्ट्राचे टेंशन वाढवणारी बातमी समोर, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी, चिंतेचे वातावरण?
लातूर – लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल ४ हजार कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे टेंन्शन वाढलं आहे. उरण, लातूर पाठोपाठ आता नांदेडमध्ये बर्ल्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट झाल्या आहेत. पशू संवर्धन विभागानं आता परिसरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनीही कोंबड्याचं मांस खाताना शिजवून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाने नागरीकांनी भीती बाळगू नये असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान त्यामुळे सद्य घडीला चिकन आणि उकडलेली अंडी खावीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या भागातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, अशा भागामध्ये चिकन आणि अंडी खाण्यास हरकत नाही. पण लागण झालेल्या भागात धोका असल्यामुळे खबरदारी म्हणून चिकन आणि अंडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्यात बर्ड फ्लूने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म चालक आणि मालकांची चिंता वाढली आहे. तर हाॅटेल व्यवसाय देखील थंडावण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने तो रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने दक्षतेसंदर्भात उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांना त्यांच्या फार्मची स्वच्छता आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी योग्य प्रकारे शिजवलेले मांस आणि अंडी सेवन करण्याच्या सल्ल्याचे पालन करावे, असेही प्रशासनाकडून सुचवण्यात आले आहे.