“मी विसरलोय तिला हे कळू देऊ नका”
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्र्यांची चर्चा, नेमक काय घडल?
मुंबई – नव्या वर्षात संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शौर्य, धैर्या, प्रेम, मान, अपमानाची कथा असलेला “संगीत मानापमान” हा सिनेमा १० जानेवारी २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी त्यांच्या एका वाक्याने एकच हशा पिकला होता. त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’च्या ट्रेलर लाँचला सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. पण, या कार्यक्रमाला ते एकटेच आले होते. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजर नव्हत्या. संगीत संबंधित चित्रपट आणि गायिका असलेल्या अमृता फडणवीस हजर नसल्याने याची चर्चा होत होती. याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की,
संगीत मानापमान’ सिनेमा सर्व रेकॉर्ड तोडेल. हा चित्रपट पाहण्यासाठी मी माझी पत्नी अमृताला घेऊन येईन. खरं तरं तिला आज यायला आवडले असते. या कार्यक्रमाला तिला आमंत्रण होते. पण, हे मी तिला सांगायचं विसरलो. तर तिला हे कळू देऊ नका” असं ते गंमतीत म्हणाले. यानंतर एकच हास्यकल्लोळ उसळला होता. दरम्यान अमृता फडणवीस गायिका असून त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.