Latest Marathi News
Ganesh J GIF

डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

पुणे प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय संस्था ‘ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी’ च्या ग्रेस लेडीज ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पुण्यातील डॉ.रिता मदनलाल शेटीया यांची “ग्लोबल रेकॉर्ड ऑफ मोस्ट इन्स्पायरिंग वुमन ब्लड डोनर” (Global record of most inspiring woman blood donar) म्हणून नोंद करण्यात आली.

या अगोदर शेटीया यांना २०१५ मध्ये “रक्त दाता” हा पुरस्कार रोहिणी जाधव ट्रस्ट, दौंड, यांच्या वतीने निवृत्त आयएएस अधिकारी आणि चाणक्य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. नुकतीच शेटीया यांची आंतरराष्टीय संस्था ‘ग्रेस लेडीज ग्लोबल अकॅडमी’ च्या राजदूत पदी नियुक्ती झाली आहे.

शेटीया यांनी आता पर्यंत १८ वेळा रक्त दान केले असून त्या रक्तदानाविषयी जनजागृती करून आणि सार्वजनिक मोहिमेद्वारे लोकांना रक्त दानाचा एक भाग होण्यासाठी प्रेरित करतात. महिला असूनही तुम्ही 18 वेळा रक्तदान केले. सर्वप्रथम महिलांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. पण तरीही, तुम्ही करत असलेले रक्तदानाचे कार्य मोठे आहे.सर्व स्तरातून रिता शेटीया यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!