Latest Marathi News
Ganesh J GIF

शारदा शिक्षण संस्था आणि ससाणे वाडा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, हडपसर येथे वन संवर्धन दिन साजरा

पुणे प्रतिनिधी – २३ जुलै २०२२ रोजी शारदा शिक्षण संस्था आणि ससाणे वाडा पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, हडपसर येथे वन संवर्धन दिन साजरा करण्यात आला.

या दरम्यान प्रमुख पाहुण्या म्हणून मधुरा रेसिपी च्या संचालिका सौ. मधुरा बाचल ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमा वेळी शारदा शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शीतल माळी यांनी संस्थेच्या टीचर ट्रेनिंग कोर्स बद्दल उत्तम माहिती सांगून महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांना टीचर ट्रेनिंग कोर्स बद्दल माहिती देऊन महिला सबलीकरणाचा जागर करणे असे होते. मधुरा बाचल यांनी महिलांना टीचर ट्रेनिंग कोर्स बद्दल मौल्याचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी रोहन ससाणे (ससाणे वाडा पंच मंडळाचे अध्यक्ष), सागर ससाणे (सचिव), पोलीस सेवानिवृत्त आयुक्त मालक तुकाराम वाघोले, सुनीता वाघोले, संजीव माळी (सचिव, शारदा शिक्षण संस्था) शांभवी तांबे (ऍडमिनिस्ट्रेशन हेड शारदा शिक्षण संस्था) अरुण ससाणे , सुधाकर झुरंगे, श्रिया पत्थर (SRPF BRANCH), त्रिशाला वर्मा (VIDYAJYOTI BRANCH), सुरेखा भोसले (NEW ENGLISH SCHOOL), आदी मान्यवर उपस्थित होते.

वनसंवर्धन दिनानिमित्त झाडांच्या बियाण्यांचे वाटप पालकांना करण्यात आले व शाळेतील मुलांनी वनसंवर्धन दिन या विषयावर कविता व भाषण सादर केले. यावेळी श्वेता मगरे, शारदा शिक्षण संस्थेच्या, प्रकल्प व्यवस्थापिका यांनी सूत्रसंचालन करून पूर्ण कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. कार्यक्रमाचा शेवट संस्थेच्या आजी व माजी विद्यार्थिनींनी त्यांचा अनुभव सांगून केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!