Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदेना धोबीपछाड देत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचा हा प्लान

मुंबई दि २० (प्रतिनिधी) – शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपाला पाठिंबा दिला. त्याचबरोबर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. आता तर त्यांनी दसरा मेळाव्यावरही दावा केला आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदान अर्ज करूनही शिवसेनेला मिळालेले नाही. पण आता शिंदेना शह देण्यासाठी ठाकरेंनी नियोजन केले असून शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा निर्धार केला आहे.

शिवसेनेने २२ आॅगस्टला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज केला आहे.तर शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी देखील दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळण्याकरता महापालिकेकडे अर्ज केला आहे.बीकेसी मतदानासाठी दोघांनी अर्ज केला होता. पण शिंदे गटाचा पहिला अर्ज आल्याने त्यांना मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. पण शिवाजी पार्क मैदान गोठवण्याची तयारी शिंदे सरकारकडून केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दसरा मेळावा महत्वाचा असल्याने महापालिकेने शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी न दिल्यास शिवसेना थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे.महापालिकेनं जर प्रकरण अधिक ताणलं तर उद्धव ठाकरे थेट मैदानात जाऊन मेळावा घेतील, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे महापालिका आणि पर्यायाने शिंदे सरकार काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.

बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी टॅक्सीवर उभं राहून भाषण केलं होतं.हाच संदर्भ घेत शिवसेना शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे. दसरा मेळावा अवघ्या पंधरा दिवसावर आला असल्याने शिवसेना आक्रमक झाली असल्याने आगामी काळात मोठा संघर्ष पहायला मिळणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!