Just another WordPress site

अगोदर लावणीत अश्लील हावभाव टिका होताच झाली उपरती

रूपाली पाटील यांची भेट 'या' सोशल मिडीया स्टारने मागितली जाहीर माफी

पुणे दि २२ (प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात.पण यातील काही व्हिडीओमुळे वाद निर्माण होतात.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी पाटील या तरुणीने लावणीच्या गाण्यांवर थिरकताना आक्षेपार्ह हावभाव केल्याने वाद निर्माण झाला आहे. तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गौतमी पाटीलचा व्हायरल होणारा व्हिडीओ एका सार्वजनिक ठिकाणचा आहे. यात ती एका गाण्यावर नाचत असताना विचित्र हावभाव केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी असे बीभत्स हावभाव केल्याने अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. लावणीसारख्या लोककलेला बदनाम केल्याने अनेक लावणी कलावंतानी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची समृद्ध लावणीकला अशा प्रकारे सादर करण्यावरून मेघा घाडगे यांनीही गौतमीची भेट घेऊन तिची कानउघाडणी केली आहे. यानंतर गौतमी पाटील हिने माफी मागणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र काही तासांनी हा व्हिडीओसुद्धा डिलीट करण्यात आला. पणजेलवारी करण्याचीही वेळ तिच्यावर येण्याची शक्यता निर्माण झाल्यावर तिने राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त केली आहे.

GIF Advt

गाैतमी पाटील ही याआधीही असे वादग्रस्त हावभाव करत वाद ओढवून घेतले आहेत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात अशाच अदा दाखवल्या होत्या. पण, दहीहंडीनंतर तिच्यावर खऱ्याअर्थाने टीका होण्यास सुरुवात झाली. पण आता तिने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत,यापुढे आपल्याकडून असा प्रकार होणार नाही. आपल्याकडून अनावधानाने हे झाल्याचे तिने कबूल केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!