जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचे छापे
जयंत पाटील यांच्या अडचणी वाढणार, एवढ्या कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, राजकारण तापणार?
सांगली दि २४(प्रतिनिधी)- आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईची घटना ताजी असतानाच आता सांगलीतून जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी बॅंकेच्या कार्यालायावर छापा टाकण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. सांगलीसह इस्लामपुरात ईडीने छापे मारले असून पश्चिम महाराष्ट्रातील १४ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या बॅंकेने बनावटा कागदपत्रांच्या आधारे बॅंकेत खाती उघडून मोठ्याप्रमाणात रक्कमा वळत्या केल्या आहे. यामध्ये बॅंक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. यासाठी ईडीकडून या बॅंकेच्या १० वर्ष जुन्या १ हजार कोटी रूपायांच्या व्यवहारांची तपसणी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच बनावट कंपनीद्वारे कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दोनवेळा चौकशी केली होती. त्यामुळं आता या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. मात्र यावर अद्याप जयंत पाटील यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ते यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सांगलीत ईडीकडून काल सकाळपासून एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकल्याचे समोर आलं आहे. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरुन या पाच व्यापाऱ्यांकडे एकूण साठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. रात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटोपून मुंबईकडे रवाना झाले. यामध्ये सांगली शहरातील इलेक्ट्रीक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेशव सुरेश पारेख आणि अविंद व ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.