Just another WordPress site

आठ वर्षांच्या मुलाने घेतलेल्या चाव्यात कोब्राचा मृत्यू

कोब्रा चावूनही मुलगा ठणठणीत, बघा नेमक प्रकरण काय?

छत्तीसगड दि ४(प्रतिनिधी)- छत्तीसगडमधील एका विचित्र घटना समोर आली आहे.एका आठ वर्षाच्या मुलाने चक्ज कोब्रा नागाचा चावा घेतल्याने नागाचा मृत्यू झाला आहे. जसपूर जिल्ह्यामधील पंढरपेढ या दुर्गम भागातील एका गावामध्ये या मुलाच्या हाताला सापाने विळखा मुलाने नागापासून आपली सुटका करुन घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. ज्यात नागाचा मृत्यू झाला आहे.तर मुलगा ठणठणीत आहे.

GIF Advt

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक नावाचा मुलगा त्याच्या घरामागील अंगणामध्ये खेळत असताना त्याचा विषारी कोब्राने चावा घेतला. दिपक म्हणाला की, ‘सापाने माझ्या हाताला विळखा मारला आणि हाताचा चावा घेतला. मी हात झटकून सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे मी दोन वेळा सापाला चावलो,’ पण त्याच्या या वागण्याने कोब्राचाच चावा घेतला आहे. या घटनेनंतर दिपकला जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं. त्याला सापाचं विष उतरवणारं औषध देण्यात आले. सध्या दिपकची प्रकृत्ती उत्तम आहे. दिपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. त्याला साप चावला तरी त्याच्या शरीरामध्ये विष भिनलं नव्हतं. असे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

जसपूर हे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला नागलोक असंही म्हटलं जातं कारण या ठिकाणी २०० हून अधिक सापांच्या प्रजाती आढळून येतात. पण या घटनेने सगळेच चकित झाले आहेत. सोशल मिडीयसवरही याची चर्चा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!