Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ पवार यांचा ठाकरे गटाकडुन विधानसभेची उमेदवारी निश्चित?

या मतदारसंघातून भाजपालाच देणार आव्हान, भाजपाच्या खासदार कन्येसोबत होणार लढत?, राजकीय समीकरणे बदलणार?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडले असून, त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पिंपरी- चिंचवड महापालिकेमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

एकनाथ पवार यांनी रविवारी भाजपाला रामराम ठोकला होता. भाजपामध्ये त्यांनी शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पक्षप्रवक्ते अशी विविध पदे भूषविली होती. विशेष म्हणजे २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी पिंपरीमध्ये सभा घेतली होती. मात्र भाजपा, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी लढत झाल्याने अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पण नंतर विजयी उमेदवार महेश लांडगे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघाकडे फिरवला होता. त्यांनी मतदारसंघात काम करण्यास सुरूवात देखील केली होती. कारण पक्षाकडुनच त्यांना तसे आदेश देण्यात आले होते. पण भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांची ही हक्काची जागा सोडण्यास नकार दिला आहे. कारण त्या ठिकाणी चिखलीकर यांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. आगामी निवडणूकीत या ठिकाणी भाजपाकडुन चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे- चिखलीकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करत लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात भाजपाला आव्हान दिले आहे.

नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणार या अटीवरच पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तर प्रणिता देवरे- चिखलीकर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारण प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची पहिल्या लढतीचे उमेदवार ठरल्याचीही चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!