Latest Marathi News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी स्वप्निल काळे यांची निवड

युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचा स्वप्नील काळे यांचा संकल्प

बार्शी दि १७(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्‍यातील पांगरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांचे सुपुत्र स्वप्निल काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नियुक्तीचे पत्र आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बळीराम साठे, विश्रवास बारबोले, कृष्णराज बारबोले, लतिफ तांबोळी, प्रिया पाटील, मोहसीन शेख, गणेश पाटील, कविता म्हेत्रे, धनंजय साठे, मयूर काळे,अभिषेक आव्हाड, महेश चव्हाण यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वप्निल काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शरद पवार यांच्या विचारांनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे स्वप्निल काळे यांनी माध्यमांना सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!