Latest Marathi News
Ganesh J GIF

जळगाव जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात, अकरा ठार

अफवेमुळे मोठी दुर्घटना, रेल्वेखाली चिरडून प्रवाशी ठार, अनेकजण जखमी, मृतांचा आकडा वाढणार

जळगाव – मुंबईच्या दिशेने येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेसला पाचारोनजीक आग लागल्याची अफवा परसल्यामुळे प्रवाशांनी उड्या मारल्याने दुसऱ्या एक्स्प्रेस खाली येऊन आत्तापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील ही भीषण घटना पाचोरा ते परधाडे दरम्यान बुधवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान घडली. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या पुष्पक एक्स्प्रेस गाडीतून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन कर्नाटक एक्सप्रेस आली. या गाडीखाली येऊन प्रवाशांचा मृत्यू झाला. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती. जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. हे प्रवाशांनी आग लागली अशी आवई उठवली त्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेली. मृत प्रवाशांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेली नाही.मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळावर ठिकठिकाणी मांसाचे तुकडे, कुठं शीर तर कुठे मृतदेह आढळून आले आहेत. पुष्पक एक्स्प्रेस ला पाचोरा रेल्वे स्थानकात आणण्यात आली आहे, तर बंगळूरू एक्स्प्रेस अद्यापही घटनास्थळीच आहे. बचाव कार्य सुरु आहे. अनेकांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरकारकडून मृतांच्या नातेवाईंकांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!