
कर्मचाऱ्यांच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा अडकवून रांगायला लावले
खाजगी कंपनीतील संतापजनक व्हिडीओ व्हायरल, कर्मचाऱ्यांना जनावरांसारखी वागणूक, कर्मचाऱ्याचा छळ
केरळ – केरळ राज्यातील एर्नाकूलम जिल्ह्यातील कोच्ची येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी मार्केटिंग कंपनीने आपल्याच कर्मचाऱ्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तुच्छ वागणूकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मार्केटिंग कंपनी म्हटले की कर्मचाऱ्यांना आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण समोर आलेला व्हिडिओ चीड आणणारा आहे. टार्गेट पूर्ण न केलेल्या कर्मचाऱ्यांना व्यक्तीच्या गळ्यात पट्टा बांधलेला दिसत आहे. यावेळी एक माणूस त्याला कुत्र्यासारखे गुडघ्यावर चालायला लावत आहे. तर एका कर्मचाऱ्याला कपडे काढण्याची शिक्षा देण्यात आली आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याला जमिनीवर नाणे चाटण्याची शिक्षा देण्यात आली आहे. या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारच्या श्रम विभागानेही या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या या अपमानास्पद प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. श्रम मंत्री वी. शिवनकुट्टी यांनी सांगितले की या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा श्रम अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ काही महिन्यापूर्वी घडली असून ज्या व्यवस्थापकाने हे कृत्य करण्यास भाग पाडले होते, त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे तो बदनामी करण्यासाठी असे करत असल्याचा दावा केला आहे. अनेकांना नोकरी जाण्याचे भीतीने बोलण्यास नकार दिला आहे.
घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली. या प्रकरणात आमच्याकडे कुणीही तक्रार केलेली नाही. जागेच्या मालकानेही देखील सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणात कोणतीच तक्रार दाखल झालेली नाही. तरी देखील माहिती मिळताच चौकशी सुरू करण्यात आली आहे.