Just another WordPress site

शिवप्रताप दिनी प्रतापगड परिसरातील अतिक्रमण हटवले

शिंदे फडणवीस सरकारचा गनिमी कावा, शिवप्रेमी आनंदित

सातारा दि १०(प्रतिनिधी)- शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत शिंदे फडणवीस सरकारने प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानच्या कबरीशेजारील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. या कारवाईबद्दल शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.पण या कारवाईनंतर खबरदारी म्हणून परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

GIF Advt

प्रतापगडावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्य सरकार आणि सातारा जिल्हा प्रशासन यांनी अत्यंत गुप्तता बाळगली. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या बैठका झाल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी होवू नये याचकरिता ही खबरदारी घेण्यात आल्याचं पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं. आम्ही हे ठरवून केलेलं नाही. आजच्या तारखेचा योगायोग नसून २०१७ च्या हायकोर्टाचा आदेशाचं पालन करत हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत असल्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.अफजल खान कबर परिसरात बांधण्यात आलेल्या १९ अनधिकृत खोल्या पाडण्यात आल्या. अफझल खानच्या अनुयायांकडून थडग्याचे उदात्तीकरण करण्यात येतंय. यामुळे कबर परिसरात झालेले अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशा मागणीने जोर धरला त्यामुळे सरकारने अचुक टायमिंग साधत धडक कारवाई केली. पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली. प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल १५०० पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासून सातारा प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याशेजारील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून हातोडा पडला आहे. या कारवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. तर शिंदे फडणवीस सरकारवर शिवप्रेमी काैतुकाचा वर्षाव करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!