लग्नाला तीन वर्ष होऊनही पतीकडुन सतत शारीरिक आणि मानसिक त्रास
खचलेल्या प्रियंकाने वट पोर्णीमेच्या आदल्या दिवशी घेतला नको तो निर्णय, महाड हादरले, काय घडले
रायगड दि ३(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील टेमघर गावामध्ये एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वट पोर्णीमेच्य पुर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका अशोक शिंदे असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विकास आणि प्रियंका यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून पती विकास सतत पत्नी प्रियांकाला मारहाण व शिवीगाळ करून तिचा छळ करीत होता. तसेच न नांदवण्याची धमकी देत होता. त्यामुळे प्रियंका सतत काळजीत असायची. घटनेच्या दिवशी देखील विकासने प्रियंकाला त्रास दिला त्यामुळे खचलेल्या प्रियंकाने आपल्या शिलाई दुकानात आत्महत्या करत आपले जीवन संपवले. यानंतर विकासवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्यामकांत साधू सिलिमकर यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत. पण वट पोर्णीमेच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.