Latest Marathi News
Ganesh J GIF

‘शिवसेनेसोबत युती करून भाजपाने मोठी चूक केली’

भाजपा नेते विनोद तावडे यांचा गाैप्यस्फोट, वक्तव्याने युतीत तणाव म्हणाले शिवसेना दुय्यम स्थान...

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यात सध्या शिवसेना भाजपाचे सरकार असले तरी पोतामध्ये सतत वाद निर्माण होत असतात त्यातच भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकादा युतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली युती किंवा युतीचा निर्णय ही एक चूकच होती, असे तावडे म्हणाले. त्यामुळे राजकारण होण्याची शक्यता आहे.

मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात तावडे यांनी हा दावा केला आहे. तावडे म्हणाले की, २०१९ साली काही जणांचा मतं होतं की, शिवसेनेबरोबर युती करावी, काहींच्या मते युती करु नये असं होतं. मला तेव्हा वाटत होतं की, भाजपाने युती करण्याची गरज नव्हती. शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणं हे त्रासाचं होतं. सेना पक्षप्रमुखांना कधी हे चालणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका असोत किंवा आणखी कोणत्या जागावाटपात एक तरी जागा आम्हाला जास्त राहू द्या, असा त्यांचा माइंडसेट होता. त्यामुळे दुय्यम भूमिका त्यांनी कधीच चालणारी नव्हती असे तावडे म्हणाले. त्यामुळे २०२४ ला भाजपा कोणता निर्णय घेणार त्याचबरोबर सध्या शिंदे गटासोबत असलेली युती तात्पुरती आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अर्थात तावडे यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केली असली तरीही सध्या शिवसेनेची कमान एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. त्यामुळे आगामी काळातही युतीत तणतणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना या पद्धतीने दगाफटका करेल याची कल्पना भाजपला नव्हती. यामुळे त्यांचा तत्कालीक फायदा झालाही असेल पण, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे वाक्य होते की दिलेला शब्द पाळायचा. तेच उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये मोडले. त्यामुळे जुने शिवसैनिक नाराज झाले असा दावाही तावडे यांनी केला आहे.

नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी म्हणाले. एकनाथ खडसे यांना पुन्हा पक्षात येणाचं आवाहन विनोद तावडे यांनी केलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपला गरज आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!