दिराच्या लग्नात वहिणीचा डान्स पाहूनही पाहुणेही थक्क
वहीनीचा डान्स सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, कॅप्शन तुम्हाला देखील आवडेल?
मुंबई – लग्न सोहळा हा प्रत्येक घरातील आनंदाचा सोहळा असतो. खासकरुन एखाद्या घरात जर दोन भाऊ असतील तर शेवटच्या नावाचा लग्न सोहळा म्हणजे मोठी पर्वणी असते. सध्या सोशल मिडीयावर आपल्या धाकट्या दिराच्या लग्नात नाचणाऱ्या वहीनीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
कोणत्याही घरात दीर आणि वहिनीची जोडी सर्वात हिट मानली जाते. कारण हे नाते मैत्री बरोबरच मातृत्वाची ही प्रचिती देणारे असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक वहिणी आपक्या दिराच्या लग्नात लो चली मे अपने देवर की बारात ले के या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत वहिणीचा नवरदेव असलेला दीर देखील थिरकताना दिसत आहे. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी दाद दिली आहे. अनेकांनी वहिनींच्या नृत्यकौशल्याचेही कौतुक केले आहे. एकंदरीत वहिनींनी आपल्या डान्सने संपूर्ण कार्यक्रमात धम्माल आणली, त्यातून त्यांच्या एनर्जीचीही लोक तारीफ करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि अनेक जण त्यावर मजेशीर कमेंटही करत आहेत. हा डान्स व्हिडिओ @marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
अलीकडे लग्नात एन्ट्रीदरम्यान डान्स करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होत आहे. वधू तर कधी वर डान्स करताना दिसत असतो. पण सध्या व्हायरल व्हिडीओत वहिनी भाव खाऊन गेली आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.