
उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही
शिंदे गटाच्या आमदाराची बाळासाहेब ठाकरेंवर टीका, एकनाथ शिंदेंनाही दिला इशारा, नेमक काय घडल?
बुलढाणा – बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कॅन्टीनचालकाला मारहाण केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा देखील झाला होता. तसेच ते आपल्या बेताल वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. आता त्यांनी चक्क अप्रत्यक्षपणे बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाने आणि भाजपने मतांची चोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे आज राज्यात मतचोरीच्या चाैकशीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्वतःला ‘ओरिजनल’ ठरवत, “माझी कॉपी उबाठाच्या बापालाही जमणार नाही” अशी टीका केली आहे. संजय गायकवाड म्हणाले की, उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहे, तो सर्व रिकामचोट पक्ष राहिला आहे. त्यांना काही काम राहिले नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर “निवडणूक आयोगाने कायदेशीर धनुष्यबाण आम्हाला दिला आहे. या विधानसभेत आम्ही ६१ जागांवर विजयी झालो आहोत. जनतेच्या न्यायालयाने आम्हाला जिंकवून दिलं, त्यापेक्षा मोठं न्यायालय नाही. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा त्यांनी केला आहे. संजय गायकवाड यांच्या या तिखट विधानांमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे.यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी एका बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा फोटो आहे. या दोघांशिवाय बॅनरवर कोणालाही स्थान देण्यात आलेले नाही. शिवसेनेचे प्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनाही बॅनरवर स्थान न दिल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होत आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे विविध आमदार, मंत्री आणि नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिंदे सेनेतील नेत्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना केल्या होत्या