Just another WordPress site

प्रेग्नंट असतानाही अभिनेत्रीने केले सगळ्यात बोल्ड फोटोशूट

गरोदरपणातील लूक व्हायरल, फोटो शेअर करत म्हणाली प्रेम...

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- सध्या बाॅलीवूडमध्ये अनेक कपल आई बाबा बनणार आहेत. हाॅट कपल अशी ओळख असलेली अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरीही नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा-करणने काही महिन्यांपूर्वीच ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती. आई होणाऱ्या बिपाशाने नुकतेच प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. यावेळी या फोटोशुटला तिने हाॅटनेसचा तडका दिला होता.

GIF Advt

बिपाशा तिच्या अनोख्या हाॅटनेसमुळे ओळखली जाते. गरोदरपणातही तिने खास फोटोशूट केले आहे. त्यातील एक फोटो तीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर तिचा या फोटोमधील अगदी बोल्ड लूक पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. बिपाशाने सोनेरी रंगाचा गाऊन परिधान करत हे फोटोशूट केलं आहे. प्रेग्नेंसीमध्येही ती किती फिट आहे हे दिसून येत आहे. एकंदरीत बिपाशा आपलं गरोदरपण एण्जॉय करताना दिसत आहे. पण या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कोणी बिपाशाचे काैतुक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. बिपाशाला या फोटोला लाखो लाइक मिळाले आहेत.

मध्यंतरीही बिपाशाने अत्यंत बोल्ड अंदाजात मॅटर्निटी फोटोशूट केले होते त्यात तिचा पती करण ग्रोव्हर देखील दिसून आला होता ते फोटो शेअर करत बिपाशाने आपण आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. यावेळी करणने पत्नीच्या बेबी बंपला प्रेमाने कीस करत फोटोशूट अजून जास्त गोड बनवले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!