Latest Marathi News
Ganesh J GIF

मा. आमदारांचे रस्ते अपघातात निधन

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, दुचाकीचा प्रवास जीवावर बेतला, या अगोदरही झाला होता अपघात

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विमानतळावर भेट घेतल्यानंतर परतत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शिवणी विमानतळावर येणार होते. त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून गेले होते. त्यांची भेट झाल्यानंतर ते परतीचा प्रवास करत असतानाच त्यांना जनावरांची वाहतूक करणा-या टेंपोने जोरात धडक दिली. दुचाकीवर प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे मित्र प्रा. राजदत्त मानकर होते. ते यात गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच वाहनातून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ज्या वाहनांने बिडकर यांच्या दुचाकीला धडक दिली त्या वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात होती. गाडी वेगाने नेण्याच्या नादात हा अपघात झाला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ही तुकाराम बिडकर यांचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर त्यावेळी मुंबईत उपचार करण्यात आले होते. त्यातून ते सावरले होते. पण अखेर त्यांचा रस्ते अपघातातच मृत्यू झाला. अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. विदर्भामध्ये माळी समाजातील ते मोठे नेते होते. अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे ते पदाधिकारी होते. राजकीयसह सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.

 

तुकाराम बिडकरे यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले होते. ते मूर्तिजापूर मतदार संघातून २००४- २००९ विधानसभा निवडणूक जिंकले होते. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम करत होते. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात सर्वच क्षेत्रात काम करण्यावर भर दिला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!