Latest Marathi News
Ganesh J GIF

रिक्षाचालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

रिक्षाला धक्का बसल्याबे रिक्षाचालक संतापला, अचानक कोसळले आमदार, व्हिडिओ व्हायरल

बेळगाव – रिक्षाचालकाने केलेल्या बेदम मारहाणीनंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना कोसळून माजी आमदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. यामुळे खळबळ उडाली आहे.

लहू मामलेदार असे त्यांचे नाव असून ते गोव्यातील फोंडा मतदारसंघातून २०१२ ते २०१७ या कालावधीमध्ये आमदार होते. मिळालेल्या माहितीनुसार लहू मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला आले असताना खडे बाजारमधील शिवानंद लॉजकडे जात होते. लॉजकडे जात असताना त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला. या घटनेत रिक्षाला काही झालं नसल्याने मामलेदार यांनी सॉरी म्हणत कार घेऊन निघून गेले. पण यामुळे रिक्षा चालक संतप्त झाला. त्याने कारचा पाठलाग करत त्यांना लाॅजजवळ गाठले. त्याने लहू मामलेदार कारमधून उतरताच भांडणाला सुरुवात करत बेदम मारहाण केली. लॉजचे चालक आणि इतर लोक मारहाणीचा प्रकार पाहून तिथे पोहोचले. त्यांनी रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मारहाण सुरूच ठेवली. जमावाने आमदारांना बाजूला केल्यानंतर ते लॉजच्या पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रिक्षाचालकावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लहू मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.

 

लहू मामलेदार २०१२ ते १७ या कालावधीत गोव्यात फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, पण जानेवारी २०२२ मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!