
फडणवीस धनंजय मुंडेच्या दुसरी बायको करुणाला सोडायला जायचे
फडणवीस आणि मुंडेंच्या मित्रत्वाबाबत गाैप्यस्फोट, देशमुख हत्याकांडाचे गुरु माऊली आश्रम कनेक्शन?
मुंबई – संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यात राजकारण तापले असतानाच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. पण यामुळे फडणवीस यांच्याबरोबर धनंजय मुंडे आणखी अडचणीत आले आहेत. तर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशातच तृप्ती देसाईंनी धक्कादायक गाैप्यस्फोट केला आहे. देसाई म्हणाल्या की, करुणा मुंडे माझ्याकडे एकदा तक्रार घेऊन आल्या होत्या, तेव्हा मला त्यांनी सांगितलं होती की, जेव्हा मी इंदोरला माझ्या घरी माहेरी जायचे. तेव्हा कधी-कधी मला विमानातून सोडायला धनंजय मुंडे यांचे मित्र म्हणून फडणवीस सोडायला आलेले होते. साधारण २००५ सालच्या आधी, १९९५ ते २००५च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे करुणा मुंडे यांना सोडायला इंदौरला त्यांच्या घरी जायचे. त्यामुळे फडणवीसांकडून करुणा मुंडेंना न्याय मिळणार नाही. उलट परळीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, असे देसाई म्हणाल्या. यावेळी दोघांमधील संभाषण सांगताना धनंजय मुंडे यांचे मित्र देवेंद्र फडणवीस असतील, तर तपास सरळ मार्गे कसा होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघे नाशिकच्या दिंडोरी येथील अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमता १५ आणि १६ डिसेंबर रोजी होते, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. आश्रमात राहण्यासाठी त्यांना कोणीकोणी मदत केली, त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणावर वातावरण तापलेलं आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी शहरात कराड समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच एक महिला आणि एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला आहे. दरम्यान तृप्ती देसाईंनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.