
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – बहिणीच्या प्रेमसंबंधाना घरच्यांनी विरोध केल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या भावाला बेदम मारहाण केली. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अब्दुल रेहमान बागवान व त्यांचे साथीदार आयान, महमद सुफियान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील साईबाबानगर येथे मंगळवारी सकाळी ८ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण व रेहमान यांच्या प्रेमसंबंधांना घरच्यांनी विरोध केला होता. त्याचा राग मनात धरुन रेहमान याने फिर्यादी याला शिवीगाळ करुन त्याच्या जवळील पट्ट्याने पाठीवर मारहाण केली. आयान, महमद, सुफियान यांनी लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करुन जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी फिर्यादीचे वडिल आले असताना आरोपी पळून जात असताना रेहमान याच्या जवळील लोखंडी कोयता खाली पडला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.