(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – कर्नाटकच्या कोलार इथं हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी लव्ह मॅरेजनंतर काही तासांतच युवकाने त्याच्या पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वत:वर वार करून आत्महत्या केली आहे. या घटनेत युवकाचाही मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ ऑगस्टला दोघांचे धूमधडाक्यात लग्न झालं, ज्यात दोघांचे मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते. लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला. त्यानंतर दोघं एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले. यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. दोघांमधील भांडण इतकं वाढलं की हाणामारी झाली.
या झटापटीत नवीननं लिखितावर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच शस्त्राने स्वत:वरही हल्ला केला. याचवेळी नातेवाईक तिथे पोहचले आणि घरचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. या दोघांनी घाईघाईनं हॉस्पिटलला आणलं मात्र त्याठिकाणी लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तोपर्यंत नवीन जिवंत होता मात्र तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.