Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन

मनोरंजक विश्वाला धक्का, चाहत्यांनाही हादरा, या गाण्याने मिळाली होती प्रचंड लोकप्रियता

मुंबई – ‘बिग बॉस १३’ आणि काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. २७ जून रोजी रात्री या अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीच्या अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरुन गेले आहे.

व्हायरल भयानी यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरूनही शेफालीच्या मृत्यूची माहिती शेअर करण्यात आली आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिने छातीत दुखण्याची तक्रार केली. तिचे पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, जिथे डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वी तिला मृत घोषित केले. शेफालीने लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १३ मध्येही भाग घेतला होता. याशिवाय तिने नच बलियेसह अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तिच्या नृत्यामुळेही ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. तसेच तिने ‘मुझसे शादी करोंगी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत काम केले होते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये जन्मलेल्या शेफाली जरीवाला हिला २००२ साली ‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे अचानक लोकप्रियता मिळाली. तिच्या जबरदस्त डान्समुळे ती रातोरात स्टार बनली. यानंतर ‘कांटा लगा गर्ल’ हे बिरूद तिच्या नावासोबत जोडले गेले. दरम्यान शेफाली जरीवाला हिने मीट ब्रदर्सचे संगितकार हरमीत सिंग यांच्यासोबत २००४ मध्ये लग्न केले होते. २००९ मध्ये शेफालीने हरमीतवर आरोप केले तेव्हा या जोडप्याचा घटस्फोट झाला. नंतर, तिने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवाला ही संगणक पदवीधर होती.

तिच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडसह संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार, चाहत्यांनी शेफालीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. शेफाली जरीवाला हिचे अचानक जाणे हे चाहत्यांसाठीही धक्कादायक आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!