Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रसिद्ध अभिनेत्रीचे हार्ट अटॅकने निधन

अभिनेत्री आठ महिन्याची गरोदर, बाळावर आयसीयुत उपचार सुरु, बाळाला न पाहताच जगाचा निरोप

मुंबई दि २(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीवर एकामागून एक दु:खाचे आघात सुरूच आहेत. कारण दोन दिवसापूर्वी एका अभिनेत्रीने आत्महत्या केली होती. पण ती घटना होत नाही तोवरच पुन्हा एकदा अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. डॉ. प्रिया असं अभिनेत्रीचं नाव असून तिच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत प्रियाचे नाव डॉ. डॉ.प्रिया यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रिया ८ महिन्यांची गर्भवती होती. प्रियाचं निधन झालं असलं तरी तिचं मूल मात्र वाचलं आहे. तिच्या लहान बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉ. प्रियाच्या निधनाची माहिती दाक्षिणात्य अभिनेता किशोर सत्याने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे दिली. सत्याने तिचा फोटो शेअर करत लिहीलं, “आपली लाडकी अभिनेत्री डॉ. प्रियाचं निधन झालं आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिचं बाळ सध्या आयसीयूमध्ये असून ते सुखरुप आहे. त्या बाळाला कुठलाही धोका नाही.” डॉ प्रिया मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने किशोर सत्यासोबत करुथमुथू शोमध्ये स्क्रीन शेअर केली होती. लग्नानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री रेंजुषा मेननच्या दुःखद निधनामुळे मल्याळम इंडस्ट्री शोकसागरात बुडाली होती. तर आता आणखी एका अभिनेत्रीचे ह्रदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले आहे.

लग्नानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतलेली प्रिया व्यवसायाने डॉक्टर होती. प्रियाच्या निधनानंतर अनेकजण सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे अभिनेत्री आपल्या मुलाला पाहू देखील शकली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!