Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडमधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झाली आयपीएस अधिकारी

पहिल्याच प्रयत्नात झाली आयपीएस, ब्युटी विथ ब्रेन बरोबरच डॅशिंग अधिकारी म्हणूनही ओळख

भोपाळ – अनेक तरुण तरुणींचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. अनेकजण यात यशस्वी होतात तर अनेकांना यात अपयश येते. पण काहीजण यासाठी दिवसरात्र एक करतात आणि त्यात एकदिवस यशस्वी होतातच. एका तरूणीने चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून ओळख मिळवूनही आपले सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

बॅलिवूडच्या या अभिनेत्रीचे नाव सिमला प्रसाद आहे. सिमलाने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नकाश’ आणि ‘अलीफ’ या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते. पण सिमलाला अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी मनाशी जिद्द आणि सातत्य ठेवून आयपीएस स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनेत्री असून ही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले. सिमला यांनी त्यांचे आयपीएस स्वप्न कोचिंगची मदत न घेता पूर्ण केले आहे. घरच्यांच्या पाठिबांमुळे त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करु शकल्या आहेत. सिमला प्रसाद या २०१० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सिमला पीएससीच्या पहिल्याच अटेंप्टमध्ये ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिची डीएसपी म्हणून पोस्टींगही झाली आहे. दरम्यान सिमला यांच्या शालेय जीवनशैलीबद्दल बोलायचे तर त्या लहानपणापासून हुशार होत्या. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये पूर्ण केले. यानंतर त्यांनी स्टुडंट्स फॉर एक्सलन्स मधून बी. काॅम करुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तूर्तास सिमला या वास्तववादी घटनेवर आधारित असलेल्या सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या ‘द- नर्मदा स्टोरी’ या चित्रपटमध्ये काम करणार आहेत.

सिमलाचा जन्म ८ ऑक्टोबर १९८० मध्ये भोपाळ शहरात झाला. लहानपणापासूनच त्यांना त्यांचे छंद जोपासण्याची आवड होती. सिमला या आपले नृत्य आणि अभिनयाचे छंद जोपासत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असायच्या. सिमला यांच्या घरातील परिस्थतीत चांगली होती. त्यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद एक आयएएस अधिकारी होते. जे नंतर खासदार देखील झाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!