बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री या आजारामुळे रूग्णालयात दाखल
सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला, अभिनेत्री आठ दिवसापासून रूग्णालयात
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सध्या वातावरणातील बदलामुळे अनेकांना वेगवेगळ्या आहारांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी अजित पवार यांना डेंगू झाला होता. आता अभिनेत्री भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण झाली असून गेल्या ८ दिवसांपासून तिला त्रास होत होता. त्यामुळे पेडणेकरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने पोस्ट करत ही माहीत दिली आहे.
भूमी पेडणेकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर केले आहेत. हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेली भूमी पेडणेकर आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे. भूमीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डेंग्यूच्या एका डासाने मला ८ दिवस खूप त्रास दिला. पण आज जेव्हा मी उठले तर मला जरा बरे वाटले. त्यामुळे सेल्फी घेण्याचा विचार केला.’ तसंच, ‘मित्रांनो… तुम्ही सर्व सावध रहा. गेले काही दिवस माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. मच्छर प्रतिबंधकचा वापर करा. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवा. प्रदूषणामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती खराब झाली आहे. माझ्या ओळखीच्या अनेकांना डेंग्यूचा त्रास झाला आहे. या विषाणूमुळे परिस्थिती आणखी बिघडली. माझी काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार.’, असं या पोस्टमध्ये भूमीने लिहिले आहे. त्याचबरोबर तिने अनेकांचे आभार मानले आहेत. माझी इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल माझ्या डॉक्टरांचे आभार @hindujahospital @bajankhusrav #DrAgarwal खूप थँक्यू नर्स , किचन आणि क्लिनींग स्टाफ तुमची खूप मदत झाली. मी कायम तुमची त्रणी राहिन. सगळ्यात जास्त आई, समू आणि माझी तनु खूप.” असे देखील ती म्हणाली आहे. भूमी लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.
भूमी पेडणेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अभिनेत्रीचा थँक यू फॉर कमिंग नुकताच प्रदर्शित झाला.मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.यानंतर भूमी पेडणेकर आणि अर्जुन कपूरचा ‘द लेडी किलर’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला पण तोदेखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत उत्सुकता आहे. याशिवाय भूमी ‘भक्त’, ‘द लेडी किलर’ आणि ‘मेरी पटनी’च्या रिमेकवर बनत असलेल्या चित्रपटांमुळेही चर्चेत आहे.