Latest Marathi News
Ganesh J GIF

सिने जगतातील प्रसिद्ध गायिकेचा भाजपात प्रवेश, उमेदवारी जाहीर

निवडणुकीसाठी भाजपची खेळी, विरोधी पक्षाची चिंता वाढली, लोकप्रियतेचा भाजपला फायदा होणार, म्हणाली माझा आत्मा...

दिल्ली – भारतीय जनता पक्षाने मंगळवारी २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ७१ उमेदवारांची नावे आहेत. पाटणा येथे पत्रकार परिषदेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी औपचारिकपणे उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

बिहार निवडणुकीत भाजप यावेळी जनता दल (संयुक्त) आणि इतर मित्रपक्षांसोबत युती करून निवडणूक लढवेल. एनडीएच्या जागावाटप व्यवस्थेअंतर्गत, भाजप २४३ पैकी १०१ जागा लढवणार आहे. त्याचबरोबर गायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार निवडणुकीत मैथिली ठाकूर अलीनगरच्या जागेवरुन निवडणूक लढवू शकतात. मैथिली ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली होती. ज्यानंतर मैथिली ठाकूर भाजपात येतील अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. भाजपा नेत्यांशी माझी सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही एनडीएला पाठिंबा देत आहोत. मी दिल्लीत कामानिमित्त राहते. मात्र माझा आत्मा आणि माझं मन बिहारशी जोडलं गेलं आहे. मी बिहारची सेवा करु इच्छिते आणि बिहारच्या विकासात माझं योगदान असलं पाहिजे असं मला वाटतं असं मैथिली यांनी म्हटलं आहे. दरम्यान मैथिली दरभंगामधील अलीनगर या मतदारसंघातून तिला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या चर्चा सुरु असताना मिश्रीलाला यादव या विद्यमान आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. 2020 मध्ये ते इन्सान पक्षातून निवडून आले होते. नंतर त्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मैथिली ठाकूर ही लोकप्रिय गायिका आहे. मैथिली तिच्या लोकसंगीत आणि तिच्या खास आवाजासाठी ओळखली जाते. मैथिलीच्या गाण्यांचे कार्यक्रम विदेशांतही होत असतात. २५ वर्षांची मैथिली ही सोशल मीडियावरही चांगलीच लोकप्रिय आहे. त्याचा फायदा उचलण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!