सततच्या संशयाला वैतागून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या
'मला मारुन टाक, नाहीतर तुला मारेन' या शब्दाने केला दहा वर्ष जुन्या प्रेमाचा करुण अंत
जयपूर दि १२(प्रतिनिधी)- प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. उदयपूरच्या खेरवाडा पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. प्रेयसीने संशयामुळे प्रियकराची हत्या केली आहे.
नरेंद्र कुमार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर हिना कुमारी असे प्रेयसीचे नाव आहे. जुना ही शिक्षिका होती तर नरेंद्र पदवीचे शिक्षण घेत होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिना आणि नरेंद्रचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी नरेंद्र हिना बरोबर फोनवर बोलत बाहेर पडला पण तो त्या रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी शेजारी, नातेवाईक आणि मित्रांकडे नरेंद्रची विचारणा केली. पण काहीच माहिती मिळाली नाही. त्याचदरम्यान सोम नदीच्या जवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयाने नदीजवळ जावून पाहिले असता तो मृतदेह नरेंद्रचा असल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलीसांनी आधी दुश्मनीतुन कोणी ही हत्या केली आहे का याचा तपास केला. पण तशी माहिती मिळाली नाही. त्यावेळी कुटुंबीयांनी नरेंद्र घटनेच्या दिवशी प्रेयसी हिनाबरोबर बोलत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नरेंद्र आणि हिना यांच्या मोबाइल नंबरचं लोकेशन मिळवलं असता दोघे रात्रभर एकाच ठिकाणी होते अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी हिनाची चाैकशी केली, पण सुरुवातीला तिने नकार दिला. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तिने नरेंद्रची हत्या केल्याची कबुली दिली. नरेंद्र आपल्यावर संशय घ्यायचा. त्याला माझे दुसऱ्याशी संबंध आहेत असं वाटायचं. तो नेहमी मला भेटायला बोलवायचा आणि पैशांची मागणी करायचा. यामुळे मी कंटाळली होती. त्यामुळे आपण त्याची हत्या केली असे हिनाने सांगितले. दारूच्या नशेत असलेल्या नरेंद्रने हिनाकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरु झालं. यावेळी नरेंद्रने मला मार नाहीतर मी तुला मारुन टाकेन असे हिनाला सांगितले. त्यामुळे हिनाने स्कार्फने गळा आवळून नरेंद्रची निर्घुन हत्या केली.
हत्या आत्महत्या वाटावी यासाठी हिनाने नरेंद्रच्या गंजीचा गळफास बनवत त्याच्या गळ्यात बांधला. नंतर मृतदेह फरफटत नदीत फेकून दिला. तसेच मृतदेह बाहेर येऊनये यासाठी त्यावर एक मोठा दगडही ठेवला होता. पोलिसांनी हिनाला अटक केली असून, अजून कोणी सहभागी आहेत का याचा तपास करत आहेत.