
गरबा खेळताना दोन तरुणींमध्ये एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी
मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, हाणामारीचे 'हे' ठरले कारण
नाशिक दि ४(प्रतिनिधी) – नवरात्रीचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा होत असताना सगळीकडे जल्लोषात गरबा खेळला जात आहे. पण ईगतपूरीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. त्या मारामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
ईगतपूरीत एके ठिकाणच्या गरबा कार्यक्रमात हा राडा झाला आहे. त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओत तरुणींचे दोन गट भिडले आहेत. सर्वजन गरबा खेळत असताना एक काळा टॉप परिधान केलेली मुलगी दुसऱ्या मुलीच्या अंगावर धावून जात तिचे केस ओढून मारहाण करु लागली. त्यानंतर इतर मुली दोघींकडे धाव घेतात आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दोन्ही मुली काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. या दोघींना सोडवण्याच्या नांदात इतर मुलींमध्ये हाणामारी सुरू होते. या हाणामारी त्या एकमेकींच्या केसही ओढताना दिसत आहेत. ही हाणामारी तिथे असलेल्या मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये शुट केली आहे. पण ही हाणामारी सोडवण्यासाठी कोणीही मध्यस्थी करताना दिसून आले नाही.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. गरब्याच्या ठिकाणी तरुण-तरुणींसह थोर-मोठ्यांची उपस्थिती दिसत आहे. पण त्यांच्यात वाद का झाला हे कारण मात्र अजून स्पष्ट झाले नाही.