Just another WordPress site

शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा ‘या’ तारखेला होणार निर्णय

निवडणूक आयोगाचे नवे आदेश, ठाकरे शिंदे गटात रस्सीखेच

मुंबई दि ४(प्रतिनिधी) – शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यातच अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून धनुष्यबाण कोणाचा हा वाद सुरू झाला आहे. पण आता निवडणूक आयोगाच्या एका आदेशाने लवकरच चिन्हाचा फैसला होण्याची शक्यता आहे.

GIF Advt

निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपले म्हणणे मांडण्यासाठी ७ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधी धनुष्यबाणावर निकाल लागण्याची शक्यता आहे. घटनापीठाने चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. आयोगाने शिवसेनेला २३ सप्टेंबरला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी  ७ ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. तसेच आता मुदत वाढवून देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत ठाकरे गटाने आपले म्हणणे सादर केल्यानंतर आयोग आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधीच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाने ही पोटनिवडणुक न लढल्यास धनुष्यबाण चिन्ह या निवडणुकीपुरते का होईना ठाकरेंना देऊ शकते ही निवडणूक भाजपा लढवणार आहे पण धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यासाठी शिंदे गट या निवडणूकीत अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आणि चिन्ह गोठवल्यानंतर अर्ज मागे घेण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!