
माजी मंत्री छगन भुजबळ यांचा भाजपात प्रवेश?
त्या बॅनरमुळे चर्चेला उधान, भुजबळ यांचा अजित पवारांना धक्का?, काय आहे बॅनरवर?
नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ चांगलेच नाराज आहे. पण आता भुजबळ अजित पवार यांना दणका देणार आहेत.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत नाराज आहेत. त्यामुळे त्यांची भाजपासोबत जवळीक वाढत चालली आहे. नुकतेच अमित शहा नाशिक जिल्हा दाै-यावर आले होते. यावेळी मालेगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या स्वागतासाठी लागलेल्या भुजबळांच्या बॅनर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ आणि अजितदादांचा फोटोही गायब होता. सहकार परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी हजेरी लावली.एवढंच नाही तर दूर बसलेल्या भुजबळांना थेट आपल्या शेजारची खुर्ची देत शाहांनी जवळ बोलवून घेतले होते. तसेच त्यांच्यात चर्चाही झाली होती. त्यामुळे छगन भुजबळ यांची फक्त भाजपा प्रवेशाची ओैपचारिकता बाकी असल्याचे बोलले. जात आहे. भुजबळांना आधी राज्यसभेतून डावलले.त्यानंतर त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे नाराज झालेले भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चा त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यापासून सुरु आहेत. पण आता अमित शहा यांच्याशी भुजबळ यांची जवळीक भाजपा प्रवेशाचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.
भुजबळ यांनी अजित पवारांवर अनेकदा थेट हल्ला चढवला आहे. अलीकडेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत खदखद व्यक्त केली होती. त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते त्यांची भेट घेणार का? हे पहावे लागेल.