Just another WordPress site

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील या चार खासदारांना मंत्रीपदाची लाॅटरी

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, शिंदे गटालाही संधी मिळणार?

दिल्ली दि २४(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीला डोल्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्रिमंंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही फेरबदलामध्ये समाविष्ठ करून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. तर काही मंत्र्यांना नारळ दिला जाणार आहे.

GIF Advt

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनात या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. निष्क्रीय मंत्र्यांना नारळ देऊन निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या खासदारांचा नव्या फेरबदलामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या फेरबदलात महाराष्ट्रातील आणि विशेष करुन शिंदे गटातील खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमध्ये सध्या असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या कामाची समीक्षा करण्यात येते आहे. ज्यांचे प्रगतीपुस्तक खराब आहे, अशा मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात येणार येईल, अशी माहिती आहे. किमान १२ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.भाजपा लोकसभेचा विचार करुन महाराष्ट्रात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांना मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव या दोन खासदारांच्या नावांची चर्चा सध्या शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी सुरु आहे. त्यामुळे कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाला संधी मिळणार हे पहावे लागेल.

नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आगामी काही राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि महत्वाच्या असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या समीकरणाचा विचार केला जाणार आहे. ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, किंवा ज्या ठिकाणी गरज आहे, त्या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता जास्त असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!