
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- सध्या सोशल मिडीयावर दोन मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. दोन मुली रस्त्याच्या मधोमध एकमेकींचे केस ओढत जोरदार हाणामारी केली आहे. या रस्त्यावरच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत त्यांच्यात दुश्मनी असल्यासारख्या त्या एकमेकीवर तुटून पडल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रात्रीची वेळेस दोन मुली एकमेकींचे केस पकडून एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघींना समजावण्याऐवजी लोक त्यांचे व्हिडिओ बनवत आहेत.रस्त्याच्या मधोमध दोन मुलींमधील हाणामारीचा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ViciousVideos या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे.
Fists of fury 🤣 pic.twitter.com/4hREYWowF7
— Vicious Videos (@ViciousVideos) September 29, 2022
मुलामध्ये वाद झालेले अनेकांनी पाहिले आहेत, पण मुलींमधील हा मारामारीचा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. पण हा व्हिडिओ पाहुन दोन मुलींमध्ये कशावरून तरी वाद असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार प्रतिसाद भेटत आहे.