भावी मुख्यमंत्री अभिजित बिचुकलेंनी मुख्यमंत्री शिंदेना पत्र लिहित दिले आव्हान
‘मी बैल आहे ,माझी कॉपी कोणी करु नये म्हणत लगावला टोला, बघा काय आहे पत्रात
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- कुठलीही निवडणूक असो हमखास उमेदवारी अर्ज दाखल करणारे बिगबाॅस फेम नेते अभिनेते अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानाचे पडसाद सोशल मिडीयावर उमटले आहेत.
बिचुकले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यभरातील तमाम महिलावर्गाकडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत दिली. मात्र महिला वर्ग फक्त प्रवासच करत नाही तर संपूर्ण कुटुंबाकरिता स्वयंपाक करतात आणि घर सांभाळतात. त्यामुळे सिलिंडरच्या किंमतीत ५० टक्के सवलत द्या, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महिला वर्गाची खरी गरज असणाऱ्या सिलेंडरला १२०० रुपये द्यावे लागतायत याबाबत एकही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. त्यामुळे आपण पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर ‘महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महिला असेल, ही भूमिका मी मांडली होती, मात्र आता माझी कॉपी इतर लोक करायला लागले आहेत. मी बैल आहे, माझी कॉपी कुणी करू नये. बेडकाने बैल व्हायचं पाहू नये,’ असा टोला अभिजीत बिचुकले यांनी लगावला आहे. त्यामुळे बिचुकले पुन्हा एकदा राजकीय पटलावर चर्चेत आले आहेत.
साताऱ्याचे रहिवासी असलेल्या अभिजित बिचुकले यांनी नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उमेदवारी भूषवली. कसब्यातील नागरिकांसाठी त्यांनी नव-नवीन आश्वासनं दिली. मात्र त्यांना फक्त ४७ मतेच मिळाली. त्याचबरोबर महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री माझी पत्नी असेल असे त्यांनी जाहीर करुन धुरळा जेवला होता.