Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात टोळक्याची तरूणांना दबा धरून बेदम मारहाण

मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत व्हायरल, मारहाणीत तरुण गंभीर जखमी, पुण्यात पुन्हा गँगवाॅर?

पुणे – पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून झेड ब्रिजजवळ एका युवकावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

झेडब्रीजवर झालेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, गाड्यांची तोडफोड झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यामागे जुन्या वादाचं कारण असल्याचं समजतं. पण झेड ब्रिजसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशाप्रकारचा हिंसक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मंगळवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. एक तरूणाचा काहीजण पाठलाग करत होते. तो तरुण झेडब्रीज जवळ थांबल्यावर ते टोळके जवळ आले आणि त्यांनी त्या तरूणावर हल्ला केला. पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी दबा धरून बसलेल्या इतर हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा पकडून मारहाण केली. हल्लेखोरांनी केवळ तरुणांवरच नव्हे, तर त्यांच्या वाहनावरही कोयत्याने तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!