
कॅबिनेट मंत्र्यांचे ते शब्द ऐकून गौतमी पाटील ढसाढसा रडली
कायदेशीर कारवाईचा दिला इशारा, म्हणाली, भीती वाटली पण आता कायद्याने बोलणार, या कारणाने गौतमीच्या जीवाला धोका?
पुणे – नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नवले पूलावर ३० सप्टेंबरला पहाटे झालेल्या अपघातप्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत आली आहे. तिच्या नावावरची कार रिक्षाला धडकून रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले आहेत. आता यावर माध्यमांसमोर येत गौतमी पाटीलने आपली बाजू मांडली आहे.
अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांकडून गौतमीला या प्रकरणी क्लीनचीट देण्यात आल्यामुळे जोरदार विरोध केला जात आहे. पुण्यामध्ये गौतमी पाटील विरोधात आंदोलन करण्यात आले असून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. तरीही अपघातादरम्यान गौतमी कारमध्ये नव्हती, तरीही तिच्या नावावर नोंदणीकृत असल्याने तिला नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा व्हायरल व्हिडिओ आणि वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला असून, गौतमीने पत्रकार परिषदेत ढसाढसा रडत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. “मला ट्रोल केलं गेलं, विनाकारण बदनामी होतेय. चंद्रकांतदादांनी ‘उचलायचं की नाही?’ असं म्हणून मला भीती वाटली,” असं म्हणत तिने भावुक होत कायद्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. गौतमीने सांगितले की, ही गाडी फक्त माझी होती. मी अपघातवेळी माझ्या खासगी कामासाठी दुसरीकडे होते. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पाच दिवसांपासून मला ट्रोल केलं जातंय, मानसिक छळ होतोय. ट्रोलिंग माझ्यासाठी नवीन नाही, पण अशा प्रकारे प्रतिमा मलीन करणं चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, माझा “मानलेला भाऊ” रिक्षाचालकाच्या कुटुंबाशी भेटायला गेला आणि मदतचा हात पुढे केला. मात्र, कुटुंबाने “कायद्यानुसार जाऊ” म्हणून मदत नाकारली. “आता मी त्यांच्याशी संपर्कात नाही. त्यांनी मीडियात माझी बदनामी केली, त्यामुळे इथून पुढे कायद्यानुसारच उत्तर देईन, असे सांगताना चंद्रकांत दादांनी अशी भाषा वापरली, मला वाईट वाटलं. मी त्यांना काही बोलू इच्छित नाही. मी गाडीत नव्हते, फक्त गाडी माझी आहे एवढाच संबंध. माझी प्रतिमा मलीन झाली, त्यामुळे भीती वाटते. मी काही केलं नाही, तर घाबरू कशाला? असा सवाल गौतमीने उपस्थित केला आहे.
गौतमी पाटील हिच्या जीवाला धोका होता, अशा दावा तिच्या वकिलांनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. गौतमी पाटीलला अपघातग्रस्त रिक्षा चालकाला भेटायला जाणार होती, मात्र तिच्या जीवाला धोका होता म्हणून तिने तेथे जाणं टाळल, असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे.