
नवरदेवाचा स्वतः च्या लग्नात तरुणीसोबत विचित्र डान्स
नवरदेवाच्या अनोख्या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, डान्समुळे नवरदेव ट्रोल, एकदा बघाच
लग्नात आत्तापर्यंत नवरीचा डान्स व्हायरल झालेला आपण पाहिला आहे. पण सध्या एका नवरदेवाचा डान्स व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या लग्नात नवरदेवाने केलेला वेगळा डान्स पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधू-वर आपला आनंद द्विगुणीत करतात. सोशल मीडियावर अनेकदा लग्नसोहळ्यातील अशा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या नवरदेवाने केलेला डान्स पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे. तर नवरदेव सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेव एका मुलीबरोबर भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. बरेच लोक तिथे उभे राहून ते नृत्य पाहत आहेत. नवरदेवाच्या हटके डान्स मूव्हजमुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या नवरदेवाच्या डान्स स्टेप्स पाहून सर्व अवाक् झालेत. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही, अगदी काही सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ zindgi_ki_kahani11345667 नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. तो व्हिडिओ पाहुणे अनेकांनी नवरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी लग्न मोडले नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.