Latest Marathi News
Ganesh J GIF

विधानसभेच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी

या नेत्याचा मोठा गाैप्यस्फोट, राहुल गांधीचीही घेतलेली होती भेट, कशा जिंकणार होत्या १६० जागा

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेतली होती आणि १६० जागा जिंकून देण्याची हमी दिली होती.

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, मला आठवतंय विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नावं आणि पत्ते माझ्याकडे आता नाहीत. दोघांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं, निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यक्तिंचितही शंका नव्हती. यावेळी आपण त्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट करून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झालं. हा आपला रस्ता नाही, लोकांचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, मला माहिती अशी आहे की, दोन व्यक्ती शरद पवारांकडे गेले होते, त्यांनी मतदार याद्या मॅन्युपुलेट करून देऊन अमूक-अमूक सीट निवडून देऊ, १६० आकडा त्यांनी सांगितला होता. मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा यावर विश्वास बसला नाही. असेही आव्हाड मणाले आहेत.

शरद पवार यांनी त्या दोन लोकांनी भेट दिलेल्या ऑफरची माहिती दिली मात्र ते दोघे कोण होते हे सांगितलं नाही त्यामुळं शरद पवारांना भेटलेले ते दोघे कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!