मा.आमदार हर्षवर्धन जाधवांना पत्नीच देणार आमदारकीला आव्हान
हर्षवर्धन जाधवांच्या पत्नीची प्रचाराला सुरुवात, या पक्षातुन देणार आव्हान
श्रओैरंगाबाद दि २५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नड मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्या आपले पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत. संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात सख्य नाही त्यामुळे ही चर्चा जोर धरताना दिसत आहे.
आगामी निवडणुकीत दानवे यांच्या कन्या संजना जाधव त्यांच्या नवऱ्याविरोधातच निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. संजना गेल्या काही दिवसांपासून त्या कन्नड तालुक्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. तालुक्यातील सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा धार्मिक कार्यक्रम त्या कार्यक्रमस्थळी आवर्जून उपस्थिती लावतात. अनेक प्रतिष्ठानांच्या उदघाट्न सोहळ्यात पाहायला मिळतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संजना या कन्नड मतदार संघातून पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधातच राजकारणात उतरणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. कन्नड सोयगाव मतदार संघावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव आहे. २०२१ मध्ये देखील संजना जाधव या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होत्या त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय वारसदार या संजना जाधव नसून ईशा झा असल्याचे जाहीर केले होते. कन्नड मध्ये सध्या ठाकरे गटात असलेले उदयसिंह राजपूत आमदार आहेत. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. आता हर्षवर्धन पाटील यांना संजना जाधव कोणत्या पक्षातुन आव्हान देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक वाद अनेकदा माध्यमांसमोर आला. त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचा दावा केला होता. आता संजना जाधव या शिंदे गटाकडून रिंगणात उतरू शकतात किंवा आपल्या वडीलांमुळे भाजपात जाऊ शकतात त्यामुळे संजना जाधव या भाजपकडून रिंगणात उतरतील की, शिंदे गट हे येणारा काळच सांगणार आहे.