Latest Marathi News

लग्नाची विचारणा केल्याने प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, तरुणी बेशुद्ध आरोपी प्रियकर फरार

मध्य प्रदेश दि २५(प्रतिनिधी)- लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या आधारे पोलीसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पण प्रियकर फरार झाला आहे.

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका महिलेला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आहे. ती तरुणी आपल्या प्रियकराकडे लग्नाचा विषय काढते त्यामुळे भडकलेला प्रियकराने प्रेयसीच्या जोरात कानाखाली मारली. त्यानंतर तो तिला जमिनीवर फेकतो आणि लाथ मारतो. त्यानंतरही तो निर्दयीपणे तरुणीच्या तोंडावर जोरात लाथा मारतो. बेदम मारहाणीमुळे मुलगी बेशुद्ध झाली आहे. प्राप्त माहितीनुसार ही तरुणी अवघी १९ वर्षांची आहे.तरुणाचे नाव पंकज असल्याचे व्हिडिओतील संवादावरून दिसत आहे.पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली मात्र कोणतीही तक्रार दाखल केली नाही. आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते परंतु नंतर त्याला सोडुन देण्यात आले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून प्रचंड चर्चेत आहे.

तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर विवि् कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पण आरोपी तरुण सध्या फरार आहे. तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!