Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड

नाना पटोलेंना नारळ, दिग्गजांना बाजूला सारत काँग्रेसची सपकाळांना पसंती, या कारणामुळे झाली निवड

मुंबई – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेतील मानहानीकारक पराभवानंतर नाना पटोले यांना नारळ देण्यात आला असून, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट)-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळाले नाही. इतकेच नाहीतर अनेक दिग्गज नेतेमंडळींचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. पण नवीन नियुक्ती होईपर्यंत त्यांना पदावर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांची नावे चर्चेत आली होती. पण ऐनवेळी सपकाळ यांचे नाव पुढे आले आहे. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत पूर्व विदर्भाकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद पश्चिम विदर्भाकडे जाणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी राहिली आहे. दरम्यान २०१४ ते २०१९ या दरम्यान ते काँग्रेसचे आमदारही होते. सपकाळ लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. राज्यात फक्त १६ आमदार असताना होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्याने या निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान सपकाळ यांच्यापुढे असणार आहे

हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!