Latest Marathi News
Ganesh J GIF

चरणस्पर्श करताच आशीर्वाद देणारा बाप्पा पाहिला का?

साता-यातील या व्हिडिओची होतेय सगळीकडे जोरदार चर्चा

सातारा दि ३० (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील एका मूर्तीकाराने गणरायाची अनोखी मूर्ती बनवली आहे. या मूर्तीच्या पायावर हात ठेवताच बाप्पा उठून उभे राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. या बाप्पाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

साताऱ्यात एका मूर्तीकाराने गणपती बाप्पाची अनोखी मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती आपल्या आसनावर बसलेली आहे. पण तिच्या पायाला स्पर्श करुन नमस्कार केला तर गणपतीची मूर्ती उभी राहते आणि आशीर्वाद देते. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओतील गणेशाची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकाराचं देखील कौतुक होत आहे. राज्यात उद्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. .पण गणरायाचे आगमन होण्यापूर्वीच हा व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल होत आहे.

दोन वर्षानंतर गणरायाचे आगमन दणक्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच गणेशभक्तांनी तयारी सुरु केली आहे. यंदाच्या वर्षी देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे यापूर्वीच गणेश मंडळांनी स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!