Latest Marathi News
Ganesh J GIF

तो रशियन तरुणीला मांडीवर बसवून चालवत होता कार अचानक…

रशियन तरुणीच्या ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, भारत सरकारची गाडी आणि तरुणीचा नशा....

रायपूर – छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका रशियन पर्यटक महिलेने अपघातानंतर धिंगाणा घातल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मद्यधुंद रशियन महिला एका इंडिगो कारमधून मित्रांसमवेत जात होती. पण त्यांच्या हुल्लडबाजीमुळे मोठा अपघात घडला आहे.

रायपूर शहरातील तेलीबांधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयपी रोडवर हा अपघात झाला. ही तरुणी आपल्या मित्रासोबत कारने जात होती. यावेळी दोघेही नशेत होते. अचानक ही तरुणी कार चालवणा-या मित्राच्या मांडीवर येऊन बसली. त्यामुळे कारचे नियंत्रण सुटले आणि कारने एका स्कूटीला धडक दिली ज्यावर तीन जण स्वार होते. जखमींना गंभीर अवस्थेत तत्काळ मेकहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तरूणीने यावेळी रस्त्यात पोलीसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तरुणी आणि तरूण दोघेही नशेत होते. दोघेही भारत सरकार असं लिहिलेली इंडिका कार चालवत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, संबंधीत तरुणी रशियाची नसून उज्बेकिस्तानची आहे. ही तरुणी ३० जानेवारीपासून व्हिसावर छत्तीसगडमध्ये राहत आहे. महिला पोलीस उपस्थित नसल्यामुळे रशियन महिलेल्या मोठ्या प्रयत्नानंतर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास पोलिसांना यश आले. रशियन महिला आणि तिचा मित्र ज्या कारमध्ये बसले होते, त्याच्या पुढच्या भागाचे बरेच नुकसान झाले आहे. तसेच कारवर भारत सरकार असे लिहीले होते दुचाकीच्याही पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

पोलिसांनी रशियन तरूणीसोबत असलेल्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोकांनी संतप्त होत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!