पुणे शहरात या भागात केमिकल कंपनीत भीषण स्फोट
स्फोटानंतर भीषण अग्नितांडव, परिसरात धुराचे साम्राज्य, नागरिक भयभीत
पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता पुण्यात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग लागली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुण्यातील धायरी परिसरात पेंट कंपनीला भीषण आग लागली आहे. गल्ली नंबर २२ मध्ये ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीमुळे पाठोपाठ ७ ते ८ सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला आहे. त्यामुळे आगीचा भडका उडाला. आग लागलेली कंपनी रंगाची असल्याची माहिती आहे. कंपनीत स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीत अडकलेल्या लोकांचे बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली असून अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या आठ ते दहा अग्निशामक दल बंबांनी आग शमविण्यासाठीचे काम सुरू केले आहे.
आगीची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारखान्याच्या परिसरात लाकडाच्या वखारी आणि शेड आहेत. त्यांनाही आगीचा फटका बसला आहे. पण पुण्यात पुन्हा एकदा आगीच्या घटना सुरु झाल्या आहेत.