बाॅलीवूडमधील ‘ही’ अभिनेत्री होस्ट करणार ऑस्कर सोहळा
पोस्ट शेअर करत दिली माहिती, जगभरातील दिग्गज सेलिब्रेटिंमध्ये समावेश
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ऑस्कर हा चित्रपट सृष्टीतील जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्या ऑस्कर सोहळ्यात भारताला उंचावणारी घटना घडली आहे. . कारण ‘ऑस्कर २०२३’ च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता ती लवकरच पार पडणाऱ्या ९५ व्या ऑस्कर सोहळ्यात प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. या सोहळ्यात होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. या यादीत दीपिकासोबत जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. ‘ऑस्कर 2023’च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने भारताचं प्रतिनिधित्व केले होते.फीफा वर्ल्ड कपमध्ये दीपिकाने ट्रॉफीचं अनावरणदेखील केलं होतं. त्यामुळे दीपिका जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे भारतीये तीन सिनेमे शर्यतीत आहेत. यात एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा समावेश आहे.
दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यातील दीपिकाचा अभिनय आणि नृत्य साऱ्याचच प्रेक्षकांनी कौतुक केलं. आगामी काळात दीपिका प्रभास सोबत ‘प्रोजेक्ट के’ तर ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ आणि अमिताभ यांच्यासोबत देखील एका चित्रपटात दिसेल. शिवाय दीपिका हॉलिवूड चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.