Latest Marathi News
Ganesh J GIF

म्हणून “राष्ट्रवादी काँग्रेस”मध्ये फूट पडली – देवेंद्र फडणवीस

एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवार वादावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष केलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणूनच अजित पवार बाहेर पडले. राज्याचं राजकारण सुरुवातीला ३० कुटुंबाभोवती फिरत होतं, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. मी पुन्हा येईन हे केवळ एक वाक्य नव्हतं. मी कशासाठी येईन, हे देखील मी सांगितलं होतं. पण, लोकांनी ते एकच वाक्य प्रसिद्ध केलं. मी पुन्हा येईल असं म्हणालो होतो.

त्यानुसार मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो आहेच, पण, त्याचबरोबर दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना घेऊन आलोय, असं फडणवीस म्हणाले. काँग्रेस नसती तर भारताचं विभाजन झालं नसतं. काँग्रेस नसती तर देशात भ्रष्टाचार झाला नसता. राजकीय नेत्यांचे मुलं-मुली राजकारणात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. पण, त्यांनी स्वत: च्या हिंमतीवर यावं. हक्क म्हणून येऊ नये. नेहरुंच्या घरातील व्यक्तीच काँग्रेसचं नेतृत्व करेल असं ठरलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं कारण तेच आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं, पण ऐनवेळी आपल्या मुलीच्या हातात पक्ष दिला, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व सूत्र आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी करत होते. यासाठी विचारधारा सोडायला देखील तयार होते. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादाची ऑर्डर तोडण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत. केवळ कुणाचा मुलगा किंवा मुलगी असल्याने राजकारणात स्थान मिळणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!