Latest Marathi News

अरे ये अबू आझमी छत्रपतींना मानतो, मग ‘औरंग्या’चा लळा का लावतो?

आमदार महेश लांडगे सभागृहात संतापले, अख्खे सभागृह आवक, महेश लांडगेचे भाषण एैकाच!

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पण आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सपाचे आमदार आबू आझमी यांनी विधानसभेत ओैरंगजेबचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर चर्चा सुरु असताना आमदार महेश लांडगे यांना देखील बोलण्याची संधी देण्यात आली यावेळी त्यांचा रूद्रावतार पाहुन संपुर्ण सभागृहच शांत झाले होते.

महेश लांडगे यांचे भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे. महेश लांडगे यांनी भर सभागृहात अबू आझमी यांना झापले.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कारवाई बाबत सभागृहात चर्चा सुरू होती. आमदार लांडगे प्रश्न उपस्थित करीत असताना अबू आझमी यांनी मध्येच ”शिवाजी महाराज की जय” अशी घोषणा दिली. यावर संतापलेल्या लांडगे यांनी ”शिवाजी महाराजांना मानतो मग औरंग्याला लळा का लावतो? त्याचवेळी त्यांनी नाव घेत अबू आझमी यांना खडसावले. लांडगे बोलत असताना संपुर्ण सभागृह शांत झाले होते. लांडगे पहिल्यांदाच एवढे आक्रमक झाले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण सोशल मिडीयावर मात्र महेश लांडगे यांचे भाषण जोरदार व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा देखील भेटत आहे. महेश लांडगे यांनीही “केवळ विशिष्ट लोकांचे लांगुलचालन म्हणून आता शांत बसायचे नाही. विधानसभा सभागृहात शिव-शंभूप्रेमींच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदूस्थानमध्ये औरंग्याचे उदात्तीकरण खूपवून घेतले जाणार नाही. अशी आपली भुमिका असल्याचे स्पष्ट केले.

विधानसभेत औरंगजेबाच्या प्रकरणावरुन आज गदारोळ झाला. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे अबू आझमींवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. अबू आझमी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळीही सभागृहात गोंधळ झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!